"बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर" बीड, दिनांक – बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांसाठी आरक्षणाची यादी जाहीर झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू झाली आहे. जिल्ह्यात एकूण ६९ गट असून त्यामध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे आरक्षण तर तालुकास्तरावर तहसील कार्यालयांमध्ये पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. यावेळी अनेक इच्छुक उमेदवार आणि संबंधित लोकप्रतिनिधी उपस्थित होते. काहींना आरक्षणामुळे अनुकूलता मिळाली तर काहींना नव्या गणांसाठी तयारी करावी लागणार आहे. 📌 आरक्षणाची तपशीलवार माहिती एकूण गट: ६९ सर्वसाधारण पुरुष: २० गट सर्वसाधारण महिला: २१ गट ओबीसी: १८ गट अनुसूचित जाती (SC): ९ गट अनुसूचित जमाती (ST): १ गट 🔹 अनुसूचित जातीसाठी राखीव गट उमापुर, मोगरा, किट्टीआडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी आणि बर्दापुर हे गट अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. त्यापैकी उमापुर, मुर्शदपुर, भोगलवाडी, पिंपळनेर आणि किट्टीआडगाव हे गट SC महिलांसाठी राखी...