शुभम गिल पाठोपाठ सर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांची नाबाद शतकी खेळी. सर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामना बरोबरीत रोखला. शुभम गिल व लोकेश राहुल यांनी केलेल्या भागीदारी नंतर भारताच्या दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या वॉशिंगटन सुंदर व सर रवींद्र जडेजा यांनी अभेद्य भागीदारी रचत भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. सर जडेजा ने नाबाद १०७ व सुंदर याने १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी शेवटच्या १५ ओव्हर्स शिल्लक असतानाही सामना बाजूला ठेवण्याची ऑफर दिली होती, पण जडेजा आणि सुंदर यांनी ते नाकारले आणि शतक प्राप्त कले. भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निर्णयाची बाजू घेतली, असे म्हटले की इंग्लंडनेही अशी संधी दिली असती. आणि शुबमन गिल नेही दावा केला की जडेजा आणि सुंदर यांनी त्यांचे शतक मिळवण्यास पात्र होते.