"फुटाणे : स्वस्त पण जबरदस्त सुपरफूड" फुटाणे "शुगरपासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत… फुटाण्याचे गुण अमृतासमान" आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारे फुटाणे म्हणजे भाजलेले हरभरे, दिसायला साधे असले तरी त्यांचे आरोग्यदायी फायदे खरोखरच उल्लेखनीय आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये फुटाण्याचा उल्लेख बल्य व रक्तवर्धक अन्न म्हणून केला गेला आहे. फुटाण्यांची चव किंचित तुरट-गोडसर असली तरी त्यांच्या पौष्टिक गुणांमुळे ते शरीराला ताकद देतात. पचनक्रियेला चालना देणारे, स्नायुंना बळकट करणारे आणि लोहामुळे रक्तशुद्धी करणारे असे हे अन्न प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. आरोग्य फायदे थोड्या प्रमाणात घेतल्यास पोटातील गॅस कमी होतो व भूक वाढते. प्रथिन व कॅल्शियममुळे हाडे व स्नायूंना मजबुती मिळते. मधुमेहींसाठी फायदेशीर ठरणारे तंतूमय घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त, कारण हे पोट दीर्घकाळ भरल्यासारखे ठेवते. कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाला संरक्षण देते. पुरुषांसाठी शुक्रवर्धक म्हणून ओळखले जाते. सेवन कसे करावे? आयुर्वेदानुसार सकाळी किंवा दुपारच्या वेळेस मोजक्या प्रमाणात फुटाणे खा...