"मांडवा परिसरात बिबट्याचा वावर – ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट."
- Get link
- X
- Other Apps
मांडवा परिसरात बिबट्याचा वावर – ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट.
![]() |
| मांडवा परिसरातील बिबट्याचे चित्र |
बीड: अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मांडवा पठाण डोंगराळ भाग व या परिसरातून वान नदी गेली असल्याने बिबट्याला सुरक्षित ठिकाण उपलब्ध होत असल्याचे सांगितले जाते. बिबट्याचे हालचाल वाढल्याची बातमी समजताच पालक देखील सावध झाले आहेत. लहान मुलांना घराबाहेर खेळू न देणे, गुरेढोरे सांभाळताना विशेष दक्षता घेणे, अशा प्रकारच्या खबरदारी गावकरी घेत आहेत.
दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात गायी, बैल, वासरे तसेच शेळ्या, कुत्रे यांसारखी जनावरे बळी पडल्याचे समोर आले आहे. तक्रारी करूनही वनविभागाकडून योग्य ती कारवाई होत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वजन कमी करायचे असल्यास मोफत मार्गदर्शन त्यासाठी येथे क्लिक करा
शेजारील असलेल्या सोनहिवरा याला कुरणवाडी वान टाकळी या गावांनीही बिबट्याची धास्ती घेतली असल्याने रात्रीच्या वेळी घरातून बाहेर येणे लोक टाळत आहेत.
गावकऱ्यांचा ठाम आग्रह आहे की, परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीची मोहीम राबवावी. अन्यथा भीतीमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
- Get link
- X
- Other Apps



Comments
Post a Comment