परभणीत युवकाचा हृदयविकाराने मृत्यू
परभणी, दि. ९ सप्टेंबर: शहरातील पोलीस वसाहतीत राहणाऱ्या २४ वर्षीय रतन मुकुंद हनवते यांचे सोमवारी (८ सप्टेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. रतन हे दैठणा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस जमादार मुकुंद हनवते यांचे कनिष्ठ चिरंजीव होते.
त्यांचे पार्थिव मंगळवारी (९ सप्टेंबर) सकाळी परभणी शहरातील जिंतूर रोडवरील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार सोहळ्याला विविध स्तरातील नागरिकांनी हजेरी लावून त्यांच्या कुटुंबीयांप्रती सांत्वन व्यक्त केले.
रतन हनवते यांच्या निधनाने पोलीस वसाहतीसह संपूर्ण परभणी शहरात शोक व्यक्त केला जा
त आहे.
Comments
Post a Comment