"मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 20 वर्षांत मिळणार पूर्ण पेन्शन"
- Get link
- X
- Other Apps
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 20 वर्षांच्या सेवेवर मिळणार पूर्ण पेन्शन
UPS (Unified Pension Scheme) निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देऊन मन वळवण्याचा सरकारचा प्रयत्न.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट देण्यात आली असून, आता 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरही कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन मिळणार आहे.
आतापर्यंतची अट
पूर्वी कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन मिळवण्यासाठी किमान 25 वर्षांची सेवा आवश्यक होती. मात्र, आता ही मर्यादा कमी करून 20 वर्षे करण्यात आली आहे.
नवीन नियमांनुसार फायदे
20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर कर्मचारी पूर्ण पेन्शनसाठी पात्र ठरेल.
UPS (Unified Pension Scheme) निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनशिवाय इतरही अनेक सुविधा मिळतील.
सेवेदरम्यान कर्मचारी अपंग झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला CCS पेन्शन नियम अथवा UPS नियमांनुसार पर्याय निवडण्याचा अधिकार असेल.
त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला सुरक्षित पेन्शनचा लाभ मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना दिलासा
या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः लवकर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होईल.
परंतु कर्मचारी ओपीएस वरच अडून असल्याने या निर्णयाचा त्या कर्मचाऱ्यावर काय परिणाम होतो हे उत्सुकतेचे ठरेल.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Only OPS
ReplyDeleteOnly UPS
ReplyDeleteOnly Ops
ReplyDeleteOps
ReplyDelete