"छगन भुजबळ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या सांत्वनासाठी लातूरला जाणार."
- Get link
- X
- Other Apps
"छगन भुजबळ आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या सांत्वनासाठी लातूरला जाणार."
लातूर, दि. १२ सप्टेंबर २०२५ – लातूर जिल्ह्यातील वांगदरी (ता. रेणापूर) येथील ३५ वर्षीय भरत महादेव कराड या तरुणाने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या नैराश्यातून मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मन सुन्न करणारी असून, समाजावर खोल परिणाम करणारी आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार, दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी लातूर जिल्ह्यातील रेनापुर तालुक्यातील वांगदरी येथे आत्महत्याग्रस्त कराड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे मंत्री तसेच ओबीसीचे प्रमुख नेते छगन भुजबळ जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्या ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली परिस्थिती सर्वसामान्य ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण करणारी आहे. मात्र, संविधान आणि कायद्याच्या चौकटीत न्याय मिळवण्याचा मार्ग उपलब्ध असून त्यासाठी शांततेने आणि संघटितपणे लढा देणे आवश्यक आहे. समाजाने टोकाचे पाऊल न उचलता, धैर्य आणि संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना न्यायासाठी एकजूट राहण्याचा आणि कोणत्याही अडचणीत न घाबरता लढा देण्याचा संदेश देण्यात आला आहे.
#OBC #Latur #ओबीसीआरक्षण #संविधान #न्याय
- Get link
- X
- Other Apps
Comments


आत्महत्या करू नये.
ReplyDelete