"केवळ 3% केंद्रीय कर्मचाऱ्यांची UPS निवड; OPS कडेच कर्मचाऱ्यांचा कल." निवृत्ती वेतन व्यवस्थेबाबत केंद्र सरकारने सुरू केलेल्या UPS (Unified Pension Scheme) ला केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) विचारलेल्या प्रश्नाला PFRDA (Pension Fund Regulatory and Development Authority) कडून मिळालेल्या उत्तरानुसार, आजअखेर केवळ 70 हजार केंद्रीय कर्मचाऱ्यांनी UPS स्वीकारली आहे. एकूण 24.6 लाख केंद्रीय कर्मचारी असताना ही संख्या फक्त 3% एवढीच ठरते. यावरून कर्मचाऱ्यांचा कल अजूनही जुन्या OPS (Old Pension Scheme) कडे असल्याचे स्पष्ट होत आहे. RTI information letter सरकारने UPS मध्ये ५०% पेन्शनची हमी दिल्याचा दावा केला असला तरी, कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या योजनेकडे पाठ फिरवल्याचे आकडे दाखवतात. परिणामी, UPS वरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कर्मचारी संघटनांकडून सातत्याने OPS पुनर्संचयित करण्याची मागणी होत असताना, केवळ 3% कर्मचाऱ्यांनी UPS निवडल्याची वस्तुस्थिती केंद्र सरकारसाठी नक्कीच आत्मचिंतनाची बाब मानली जात आहे.