"अहिल्यानगर दौऱ्यादरम्यान विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी भगवानगडाला भेट देऊन समाधीस्थळी घेतले दर्शन ." "सभापती राम शिंदे भगवानगडावर नतमस्तक होताना" महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती श्री प्राध्यापक राम शिंदे सर यांनी आज शेवगाव अहिल्यानगर दौऱ्यावर असताना श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाऊन भगवान बाबांच्या समाधी स्थळे नतमस्तक झाले. श्रीक्षेत्र भगवानगड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे आज भगवान बाबांच्या समाधीस्थळी त्यांनी मनोभावे दर्शन घेतले. त्याप्रसंगी गडाचे महंत न्यायाचार्य ह भ प नामदेव शास्त्री महाराज यांचेही आशीर्वाद घेतले. याप्रसंगी श्रीक्षेत्र भगवानगड येथे चालू असलेल्या ज्ञानेश्वर माऊली यांच्या भव्य मंदिराची पाहणी त्यांनी न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यासोबत केली. हे वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचे प्रतीक असून भविष्यातही गडाची अशीच भरभराट होत राहील, आणखी गड भव्य दिव्य बनून प्रेरणादायी ठरणार आहे. "भगवानबाबांच्या समाधीवर नतमस्तक होताना त्यांना अध्यात्मिक उर्जा व समाधानाचा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले."