“शिक्षकांच्या हक्कासाठी रणशिंग फुंकले – आंदोलनाची नवी दिशा”
- Get link
- X
- Other Apps
“शिक्षकांच्या हक्कासाठी रणशिंग फुंकले – आंदोलनाची नवी दिशा”
मुंबई, ६ सप्टेंबर २०२५:महाराष्ट्रात माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीसंदर्भात नवे संकट निर्माण झाले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न झाल्याने अनेक शिक्षकांना सेवेत घेण्यास नकार मिळत असल्याने राज्यभरातील शिक्षकांमध्ये नाराजी वाढली आहे. याविरुद्ध शिक्षक परिषदेनं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सेवा न मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. अनेक अनुभवी आणि पात्र शिक्षकांना सेवेत सामावून न घेतल्याने शिक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविरोधात न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना शिक्षकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचा आदेश दिला आहे.
शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणुगोपाल कडू यांनी सांगितले की, शासनाने योग्य मार्गदर्शन करून शिक्षकांना सेवा मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. १३ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार नियुक्त शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट लावल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षक प्रभावित झाले आहेत.
शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी शिक्षक परिषदेने ऑनलाइन सभा घेत शिक्षण विभागावर दबाव आणण्याची योजना तयार केली आहे. शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी लवकरच शासन व प्रशासनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील शिक्षकांनी एकत्र येत पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment