"जवळ जवळ सर्वच जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्तीचा मार्ग मोकळा."
ठाणे व अमरावती जिल्हयातील शिक्षकांना कार्यमुक्तीचा आदेश प्राप्त. इतर जिल्ह्यातही लवकरच मिळणारा आदेश..
शैक्षणिक वर्ष 2025 26 या सालातील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचा टप्पा पूर्ण झालेला असून. ज्या जिल्हा परिषद आतील प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथील कार्यमुक्तीचे आदेश द्यायला सुरुवात झाली असून ठाणे व अमरावती जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा अंतर्गत बदली प्राप्त शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत. उर्वरित इतर जिल्हा परिषदांमध्ये ही ज्या जिल्हा परिषदांमध्ये आक्षेप नाहीत किंवा दखलपात्र आक्षेप नाहीत अशा जिल्हा परिषदांमध्ये येत्या दोन दिवसात कार्यमुक्तीचे आदेश मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे माहिती मिळाली आहे.
 |
| Add |
वजन कमी करण्याचा विचार करताय, संपर्कासाठी येथे क्लिक
जिल्हाअंतर्गत बदलांचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ही शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश मिळाले नसल्याने शिक्षकांमध्ये धाकधूक निर्माण झाली असल्याचे दिसून येत होते. परंतु जवळपास 95 टक्के शिक्षकांना त्यांच्या सोयीप्रमाणे शाळा मिळाल्या असल्याने या बदल्यांना कोणाचाही विरोध होणार नसल्याचे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेवरून लक्षात आले आहे ज्या जिल्हा परिषदांमध्ये बदली आक्षेप नाहीत अशा जिल्हा परिषदांमध्ये लवकरच येत्या दोन दिवसांमध्ये कार्यमुक्तीचे आदेश मिळून सर्व शिक्षक नवीन शाळेवर रुजू होतील. ठाणे व अमरावती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा अंतर्गत बदलीचे कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने राज्यातील सर्व शिक्षकांची धाकधूक आता संपली असून शिक्षक आता स्वतःच्या जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाची वाट पाहत असल्याचे दिसून येत आहे.
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteVery good
ReplyDelete