“IGOT प्रशिक्षण पूर्ण नाही? सप्टेंबरचा पगार धोक्यात – शिक्षण विभागाचा इशारा!”
यवतामाळ, दि. ८ सप्टेंबर २०२५:
शाळांमधील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी आता शासनाच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत IGOT डिजिटल प्लॅटफॉर्म वर दिले जाणारे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक झाले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रवींद्र काटोलकर यांनी यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांना आदेश पाठवले आहेत.
 |
| शिक्षणाधिकारी यांचे पत्र |
त्यात स्पष्ट केले आहे की, शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याने आठ दिवसांच्या आत प्रशिक्षण पूर्ण करणे गरजेचे आहे. प्रशिक्षण दिनांक ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याचा सप्टेंबर महिन्याचा पगार थांबविण्यात येईल. पगार मंजुरीसाठी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जोडणेही आवश्यक राहणार आहे.
ही प्रक्रिया शिक्षण सहसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालय यांच्या सूचनेनुसार राबविली जात आहे. त्यामुळे सर्व शाळांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्र अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असून, प्रत्येकाने वेळेवर प्रशिक्षण पूर्ण करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.
Comments
Post a Comment