महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय : ईद ए मिलाद सुट्टीच्या तारखेत बदल मुंबई, दि. ३ सप्टेंबर २०२५ महाराष्ट्र शासनाने राज्यातील ५ सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी बदलून ८ सप्टेंबर २०२५ रोजी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल मुस्लिम बांधवांच्या "ईद-ए-मिलाद" सणाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. याबाबत विविध मुस्लिम संघटनांसोबत झालेल्या बैठकीनंतर शासनाने अंतिम निर्णय घेतला. ➡️ म्हणजेच, आता मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये शुक्रवार, ५ सप्टेंबरला सुट्टी रद्द होईल आणि त्याऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी राहील. 🔹 शासनाच्या या निर्णयामुळे सुट्टीसंदर्भात असलेला गोंधळ संपला असून, राज्यातील सर्व कार्यालये व संस्था ५ सप्टेंबरला सुरू राहतील.
Comments
Post a Comment