आश्चर्यचकित झालात ना! ही आहे जिल्हा परिषदेची शाळा.ही कुठली खाजगी इंग्रजी शाळा नसून, एक जिल्हा परिषदेची पी एम श्री शाळा आहे. ही शाळा बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टी हरिनारायण असून, पी एम श्री ही एक महत्त्वकांक्षी व भविष्यावेधी शिक्षण योजना असून यामुळे मुलांना भविष्यवेधी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. एवढी हायटेक कॉम्प्युटर लॅब एका जिल्हा परिषद शाळेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. लाखो रुपये फीस घेणाऱ्या कुठल्याही खाजगी शाळेमध्ये नसेल इतकी हायटेक कम्प्युटर लॅब शासनाच्या पीएमश्री योजनेतून आमच्या शाळेमध्ये उभारण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कॉम्प्युटर, रिवायलिंग चेअर यासोबत प्रत्येक कॉम्प्युटर मध्ये प्रत्येक वर्गाच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र हेडफोन, माईक त्यासोबतच सर्व संगणक स्क्रीन टच असून त्यासाठी डिजिटल रायटिंग पेन सुद्धा आहे. हे सर्व संगणक शिक्षकाच्या संगणकाला थेट जोडलेले असून विद्यार्थी काय काम करत आहेत हे शिक्षकाला पाहता ...