आश्चर्यचकित करणारी जिल्हा परिषद शाळेची कम्प्युटर लॅब....
- Get link
- X
- Other Apps
आश्चर्यचकित झालात ना!
![]() |
ही आहे जिल्हा परिषदेची शाळा.ही कुठली खाजगी इंग्रजी शाळा नसून, एक जिल्हा परिषदेची पी एम श्री शाळा आहे. ही शाळा बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टी हरिनारायण असून, पी एम श्री ही एक महत्त्वकांक्षी व भविष्यावेधी शिक्षण योजना असून यामुळे मुलांना भविष्यवेधी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. एवढी हायटेक कॉम्प्युटर लॅब एका जिल्हा परिषद शाळेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
लाखो रुपये फीस घेणाऱ्या कुठल्याही खाजगी शाळेमध्ये नसेल इतकी हायटेक कम्प्युटर लॅब शासनाच्या पीएमश्री योजनेतून आमच्या शाळेमध्ये उभारण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कॉम्प्युटर, रिवायलिंग चेअर यासोबत प्रत्येक कॉम्प्युटर मध्ये प्रत्येक वर्गाच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र हेडफोन, माईक त्यासोबतच सर्व संगणक स्क्रीन टच असून त्यासाठी डिजिटल रायटिंग पेन सुद्धा आहे. हे सर्व संगणक शिक्षकाच्या संगणकाला थेट जोडलेले असून विद्यार्थी काय काम करत आहेत हे शिक्षकाला पाहता येते. त्यासोबतच शिक्षक विद्यार्थ्यांना आपल्या पोडियम वरून असाइनमेंट देऊ शकतात. समोर इंटर ऍक्टिव्ह स्मार्ट बोर्ड असून त्यावरील विविध ऍक्टिव्हिटी विद्यार्थी स्वतःच्या स्क्रीन टच पॅनलवर करतात. ही भविष्यवेधी शिक्षण देणारी आमची एकमेव शाळा आहे. या अभ्यासक्रमासोबतच शाळेमध्ये विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता व रोबोटिक्स चे धडे गिरवत आहेत. खऱ्या अर्थाने भविष्यवेधी शिक्षणाची पायाभरणी आमच्या शाळेमध्ये होत आहे.
पी एम श्री ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणाचे अवकाश खुले झाले आहे. आमच्या शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांच्या कृतीशीलतेमुळे आमच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अत्यंत उज्वल आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
पी एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आष्टा हरिनारायण तालुका- आष्टी, जिल्हा- बीड.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment