आरोग्यवर्धक मुगडाळ खाण्याचे फायदे एक महिना खाऊन बघा सालीची मूगडाळ, फायदे इतके की विचारही केला नसेल. भारतीय लोकांच्या दररोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश केलेला असतो. या डाळींच्या सेवनाने शरीराला प्रोटीन सोबतच इतर पोषण तत्त्वे ही मिळत असतात. त्यामुळे आरोग्य विषयक सल्लागार नेहमी डाळी खाण्याचा सल्ला देत असतात. आज आपण अशाच एका डाळीची माहिती घेणार आहोत . या डाळीच्या एक महिना सेवनाने आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपले वजन कमी करण्यासही मदत होईल. चला तर मग माहिती घेऊया मूग डाळी विषयी.. सालीची मुगडाळ खाण्याचे फायदे मूग डाळीमधील पोषक तत्व : सालीच्या मूग डाळीमध्ये आयर्न, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॉपर, फॉस्फोरस आणि मॅग्नेशिअम यांसारखे पोषक तत्व असतात. जे तुमचं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच यात आढळणारं फायबर तुमचं वजन कमी करण्यासही मदत करतं. जास्तीत जास्त लोकांना हेच वाटतं की, तब्येत बिघडली किंवा पोट खराब झालं तेव्हाच या डाळीचं सेवन करावं. पण असं काही नाहीये. या डाळीच्या सेवनाने तुम्हाला अ...