"शेतकऱ्यांसाठी मोठी संधी – ‘तार कुंपण योजना’ अंतर्गत ९०% अनुदान." राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतीचे नुकसान टाळण्यासाठी तार कुंपण योजनेत मोठा दिलासा दिला आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदान देण्यात येणार असून, त्याचा फायदा घेत शेतकरी आपल्या शेतीचे संरक्षण करु शकतात. ✅ योजनेचे फायदे : जंगली प्राणी व जनावरांपासून शेतीचे होणारे नुकसान कमी होते. उत्पादन वाढण्यास मदत होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते. चांगल्या साहित्यामुळे कुंपण मजबूत राहते, त्यामुळे प्राणी व चोऱ्यांपासून संरक्षण मिळते. शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांचे उत्पादन सुरक्षित राहते. ✅ आवश्यक कागदपत्रे : शेतीचा ७/१२ उतारा (महाडीबीटीसाठी आवश्यक). जात प्रमाणपत्र. बँक पासबुक. ग्रामपंचायतीचा दारावरील ठराव. एका घरातील एकच अर्ज स्वीकारला जाईल याचे प्रमाणपत्र. वन विभागाची दारावरील परवानगी असल्यास त्याचा दाखला. स्वयंघोषणापत्र. कृषी विषयक बातम्यांसाठी चॅनलला जॉईन व्हा ✅ पात्रता व अटी : अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. कुटुंब प्रमुख किंवा भाडेतत्वावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्ज करता येईल....