केंद्राचा नवा निर्णय : UPS मधून NPS मध्ये परतण्याची मुभा. परंतु कर्मचारी 'OPS' वरच ठाम. निवृत्तीनंतरच्या सुविधा ठरवणाऱ्या योजनांवर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे. केंद्र सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामध्ये UPS योजनेतून NPS मध्ये परतण्याचा मार्ग खुला केला आहे. या नियमानुसार, ज्यांनी UPS स्वीकारले आहे त्यांना निवृत्तीच्या एक वर्ष आधीपर्यंत NPS मध्ये परत येण्याची संधी मिळणार आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, कितीही फेरबदल किंवा सवलती जाहीर झाल्या तरीही UPS योजना प्रत्यक्षात अपयशी ठरली आहे. कर्मचाऱ्यांच्या मोठ्या गटाने सातत्याने OPS (जुनी पेन्शन योजना) परत लागू करण्याची मागणी केली आहे. UPS to return NPS option letter कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, "NPS आणि UPS दोन्ही योजनांमध्ये अनेक मर्यादा असून, दीर्घकालीन सुरक्षितता फक्त OPS मध्येच आहे." त्यामुळेच सध्याचा निर्णय हा कर्मचाऱ्यांना परत आकर्षित करण्याचा प्रयत्न असला, तरी OPS वाचवण्यासाठीची लढाई थांबणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 👉 थोडक्यात: केंद्र सरकारने UPS मधून NPS मध्ये परतण्याचा मार्ग ख...