जिल्हा बँक घोटाळ्यातील जेलवारी नंतर त्यांचाच हस्ते पक्ष प्रवेश अजित पवार यांचा बीड मध्ये भाजप ला धोका. अजित पवार यांनी महायुतीतील सहकारी पक्षाचे bjp मध्ये तब्बल 35 वर्षे राहिलेले पंकजा मुंडे यांचे समर्थक असलेले बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष श्री रजेभाऊ मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटात प्रवेश देणार आहेत. राजेभाऊ मुंडे हे गोपीनाथ मुंडे यांच्यापासून पंकजा मुंडे यांच्यासोबत आजपर्यंत भा ज प मद्ये होते.परंतु सध्या अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.बीड जिल्ह्यातील जेष्ठ नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात प्रवेश न घेता त्यांचा आ प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात प्रवेश दिला जात असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार यांनी त्यांना डीसिसी बँक घोटाळ्यात अटक केली होती.ते प्रकरण आजही न्यायप्रविष्ट आहे.जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या नेत्याला अजित पवार आज पक्षत घेत असल्याने अजित पवार नेमके सहकार सोबत आहेत का सहकार बुडवणाऱ्यांसोबत असा सवाल उपस्थित केला जात आहे.