राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला"
- Get link
- X
- Other Apps
"राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला"
![]() |
| संग्रही |
मुंबई, महाराष्ट्र राज्य आणि यावर्षी सार्वजनिक गणेश महोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचे ठरवले असून. 27 ऑगस्ट रोजी गणरायाच्या आगमन होत असून त्यापूर्वी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे पगार सप्टेंबर ची वाट न पाहता 26 ऑगस्ट पर्यंत करण्यात यावेत असा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे एक प्रकारे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल.
महाराष्ट्र राज्यामध्ये गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो विशेषता कोकण भागात. साखर मान्यांना गणेशोत्सव साजरा करताना पगाराची अडचण येऊ नये म्हणून सरकारने यावेळी गणपतीच्या आगमनापूर्वीच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात यावेत असा निर्णय घेतल्याने सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यामध्ये एकूण जवळपास 17 लाख कर्मचारी असून या निर्णयाचा फायदा प्रत्यक्ष 17 लाख कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे त्यामुळे सणासुदीच्या काळामध्ये वेतन महिन्याच्या अगोदरच होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी निर्णयाचे स्वागत केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
.jpeg)
It's a great news
ReplyDelete