लातूर जिल्ह्यातील शाळांना 29 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर
लातूर, दि. 28 : लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि तलाव तुडुंब भरले आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सध्या जिल्ह्यातील 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून 49 प्रमुख रस्ते बंद झाले आहेत.
हवामान विभागाने उद्या, शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
 |
| शिक्षणाधिकारी यांचे पत्र |
त्याअन्वये लातूर जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळांना — शासन, जिल्हा परिषद, खासगी तसेच अनुदानित व विनाअनुदानित — इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत उद्या दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment