पिक विमा भरणा 14 ऑगस्ट पर्यंत
केंद्र शासनाने पिक विमा भरण्यास 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारला जात असून एक रुपयात पिक विमा ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करून मुदत वाढीसाठी मागणी केलेली होती. त्या संदर्भात आता 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकरी विमा योजनेचा लाभ घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यावर्षीच्या पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून आपल्याला मदत व्हावी यासाठी सर्वांनी पिक विमा भरणा भरावा असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यां तर्फे करण्यात आलेले आहे.
Comments
Post a Comment