शिक्षकांना 10/20/30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची:उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी.
- Get link
- X
- Other Apps
शिक्षकांना 10/20/30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची:उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेची मागणी.
![]() |
| आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात निवेदन देत असताना महाराष्ट्राची जुनी पेन्शन हक्क संघटना सांगली पदाधिकारी |
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार सांगली दौऱ्यावर असताना आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या माध्यमातून मिरज येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे,पुणे विभागीय अध्यक्ष सागर खाडे,जिल्हा सरचिटणीस स्वप्निल मंडले,जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले,जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, माध्यमिक जिल्हाध्यक्ष बापू दाभाडे उपस्थित होते.
यावेळी दिलेल्या निवेदनात जुनी पेन्शन योजना लागू करावी.
सातव्या वेतन आयोगात शासकीय कर्मचाऱ्यांना 10,20,30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली.परंतु राज्यातील शिक्षकांना अद्याप आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली नाही. ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.
सातव्या वेतन आयोगात जानेवारी 2016 नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या वेतनात व त्या अगोदर वरिष्ठ वेतन श्रेणी मिळालेल्या शिक्षकांच्या वेतनात जवळपास दोन वेतनवाढीचा तफावत राहत आहे.सदर तफावत दूर करण्यात यावी.या मागण्या करण्यात आल्या आहेत.
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment