बीड हादरले...
बीड:बीड जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एक खासगी रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. स्वत:ला इंजेक्शन देऊन डॉक्टराने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे बीडच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ही घटना घडली. डॉ.संजय ढवळे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचं नाव आहे. ढवळे हे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉक्टर संजय ढवळे यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर ढवळे हे भूल तज्ञ म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णालयात कार्यरत होते. ढवळे यांनी भूल देण्याच्या औषधाचे इंजेक्शन त्यांनी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
Comments
Post a Comment