प्राथमीक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यामध्ये चुकीची माहिती भरली
- Get link
- X
- Other Apps
कारवाई करण्याची सिईओंकडे मागणी
बीड : प्राथमीक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या यामध्ये बोगस प्रमाणपत्र दाखल करुन शिक्षकांने आपल्या सोयीनूसार बदल्या करुन घेतल्या असून या बदल्याची चौकशी करण्याची मागणी सिईओंकडे करण्यात आली आहे.
ऑनलाईन बदली प्रकिया मध्ये संवर्ग एक दोन तीन चार असे प्रकार केलेले संवर्ग एक व दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया अगोदर केली जात असल्याने,सन 2025 मध्ये संवर्ग 1 व 2 च्या काही शिक्षकांनी शासनाची फसवणुक करुन व नियमांचे उल्लघन करुन खोटे व बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेतली. काही शिक्षकांनी संवर्ग 1 चा लाभ मिळण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र तयार केले यामध्ये मेंदुचा आजार, एनजीओ प्लास्टी इतर प्रमाणपत्राचा समावेश आहे. मेंदुचा आजार असलेले शिक्षक नोकरीसाठी फिट आहे का? याची चौकशी व्हावी, संवर्ग दोनच्या पती पत्नी एकत्रीकरणामध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपल्या जोडीदारापासून 30 किमी अंतरावरील शाळा भरणे अनिवार्य होते. परंतू सदरील बदली प्रकियेमध्ये काहि शिक्षकांनी शासनाची फसवणुक करुन नियमांचे उल्लघंन केले. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. चुकीची माहिती सादर केलेल्या शिक्षकांवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी केली जात आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment