Posts

Showing posts from July, 2025

MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्राथमीक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यामध्ये चुकीची माहिती भरली

Image
कारवाई करण्याची सिईओंकडे मागणी बीड : प्राथमीक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या यामध्ये बोगस प्रमाणपत्र दाखल करुन शिक्षकांने आपल्या सोयीनूसार बदल्या करुन घेतल्या असून या बदल्याची चौकशी करण्याची मागणी सिईओंकडे करण्यात आली आहे.    ऑनलाईन बदली प्रकिया मध्ये संवर्ग एक दोन तीन चार असे प्रकार केलेले संवर्ग एक व दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया अगोदर केली जात असल्याने,सन 2025 मध्ये संवर्ग 1 व 2 च्या काही शिक्षकांनी शासनाची फसवणुक करुन व नियमांचे उल्लघन करुन खोटे व बनावट प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या ठिकाणी बदली करुन घेतली. काही शिक्षकांनी संवर्ग 1 चा लाभ मिळण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र तयार केले यामध्ये मेंदुचा आजार, एनजीओ प्लास्टी इतर प्रमाणपत्राचा समावेश आहे. मेंदुचा आजार असलेले शिक्षक नोकरीसाठी फिट आहे का? याची चौकशी व्हावी, संवर्ग दोनच्या पती पत्नी एकत्रीकरणामध्ये शासन निर्णयातील तरतुदीनुसार आपल्या जोडीदारापासून 30 किमी अंतरावरील शाळा भरणे अनिवार्य होते. परंतू सदरील बदली प्रकियेमध्ये काहि शिक्षकांनी शासनाची फसवणुक करुन नियमांचे उल्लघंन केले. या सर्व प्रकरणाची ...

India vs Pakistan WCL 2025: आम्ही खेळणार नाही...सेमीफायनल खेळण्यास भारताचा नकार; पाकिस्तानचा थेट फायनलमध्ये प्रवेश!

Image
  India vs Pakistan WCL 2025: कोणत्याही परिस्थितीत मैदानावर पाकिस्तान विरुद्ध खेळणार नाही, असं भारतीय खेळाडूंनी आयोजकांना सांगितले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा सामना रद्द करण्यात आला.        इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL 2025) च्या उपांत्य फेरीत इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्सचा (Pakistan Champions vs India Champions) आज सामना रंगणार होता. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानसोबत उपांत्य फेरीचा सामना खेळण्यास नकार दिला आहे. इंडिया चॅम्पियन्सच्या संघाने अधिकृतपणे स्पर्धेतून आपले नाव मागे घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आहे.          जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एप्रिल 2025 मध्ये दहशतवादी हल्ला झाला, ज्यामुळे संपूर्ण देश हादरला. हल्ल्यानंतर निर्माण झालेला राजकीय आणि भावनिक दबाव भारताच्या या निर्णयामागे असल्याचे मानले जाते. हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरुद्ध वातावरण तापले होते आणि त्याचा परिणाम या स्पर्धेतही दिसून आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मैदाना...

आश्चर्यचकित करणारी जिल्हा परिषद शाळेची कम्प्युटर लॅब....

Image
         आश्चर्यचकित झालात ना!          ही आहे जिल्हा परिषदेची शाळा.ही कुठली खाजगी इंग्रजी शाळा नसून, एक जिल्हा परिषदेची पी एम श्री शाळा आहे. ही शाळा बीड जिल्हा आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आष्टी हरिनारायण असून, पी एम श्री ही एक महत्त्वकांक्षी व भविष्यावेधी शिक्षण योजना असून यामुळे मुलांना भविष्यवेधी शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. एवढी हायटेक कॉम्प्युटर लॅब एका जिल्हा परिषद शाळेत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.     लाखो रुपये फीस घेणाऱ्या कुठल्याही खाजगी शाळेमध्ये नसेल इतकी हायटेक कम्प्युटर लॅब शासनाच्या पीएमश्री योजनेतून आमच्या शाळेमध्ये उभारण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कॉम्प्युटर, रिवायलिंग चेअर यासोबत प्रत्येक कॉम्प्युटर मध्ये प्रत्येक वर्गाच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम, प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र हेडफोन, माईक त्यासोबतच सर्व संगणक स्क्रीन टच असून त्यासाठी डिजिटल रायटिंग पेन सुद्धा आहे. हे सर्व संगणक शिक्षकाच्या संगणकाला थेट जोडलेले असून विद्यार्थी काय काम करत आहेत हे शिक्षकाला पाहता ...

"पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी"

Image
🌧️ पावसाळ्यातील आरोग्य सूचना: "पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी"  पाणी आणि अन्नाची स्वच्छता: फक्त उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. रस्त्यावर मिळणारे अन्न (विशेषतः भेळ, पाणीपुरी, वडापाव) टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुऊनच वापरा. बिघडलेले, उघडे किंवा अर्धशिजलेले अन्न खाणे टाळा.   पावसाचे पाणी टाळा: पावसाचे पाणी अंगावर पडू देऊ नका, विशेषतः डोक्यावर. पायांत चिखल, पाणी साचल्यास त्वचेचे विकार होण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यास लगेच कोरडे कपडे घालावेत. स्वच्छता आणि वैयक्तिक निगा: दिवसातून दोनदा हात धुवा – विशेषतः जेवणापूर्वी आणि टॉयलेट नंतर. सॅनिटायझर किंवा साबण वापरण्याची सवय ठेवा. ओले कपडे किंवा मोजे दिवसभर न घालणे – यामुळे फंगल इंफेक्शन होऊ शकते. प्रतिकारशक्ती वाढवा आहारात ताज्या फळांचा समावेश करा (जसे की संत्री, आवळा, पपई). हलका, चविष्ट पण पचनास सोपा आहार घ्या. गरम पाणी, सूप, हर्बल टी पिणे फायदेशीर ठरते. * रोगांपासून बचाव: मलेरिया, डेंग्यूपासून बचावासाठी पाण्याचे साचलेले डबके टाळा. मच्छरदाणी, मच्छरनाशक वापरा. ताप, उलट्या, जुलाब, अंगदुखी यासारखी लक्षणे आढळल्यास त्वरित...

कांगणे सरांचे समाजातील अधिवेशनातील भाषण.

Image
       समाजातील अधिवेशनातील भाषण.

"मँचेस्टरमध्ये कठीण परस्थितीतून वाचवले—एक थरारक ड्रॉ,नैतिक निर्णयी विजयच."

Image
  शुभम गिल पाठोपाठ सर रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांची नाबाद शतकी खेळी.   सर रविंद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामना बरोबरीत रोखला. शुभम गिल व लोकेश राहुल यांनी केलेल्या भागीदारी नंतर भारताच्या दोन्ही फलंदाज बाद झाले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या वॉशिंगटन सुंदर व सर रवींद्र जडेजा यांनी अभेद्य भागीदारी रचत भारताला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले.      सर जडेजा ने नाबाद १०७ व सुंदर याने १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी शेवटच्या १५ ओव्हर्स शिल्लक असतानाही सामना बाजूला ठेवण्याची ऑफर दिली होती, पण जडेजा आणि सुंदर यांनी ते नाकारले आणि शतक प्राप्त कले.  भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निर्णयाची बाजू घेतली, असे म्हटले की इंग्लंडनेही अशी संधी दिली असती. आणि शुबमन गिल नेही दावा केला की जडेजा आणि सुंदर यांनी त्यांचे शतक मिळवण्यास पात्र होते.           

अब तुमसे मिटने का खौफ नही. शेरोशायरी करत धनंजय मुंडे विरोधकांवर बरसले..

Image
    समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांचे प्रभावी व भावनिक भाषण      ठाणे:  राज्यस्तरीय वंजारी ठाणे येथील झालेल्या समाजाच्या मेळाव्यात आज धनंजय मुंडे यांनी अतिशय प्रभावीपणे समाजापुढे आपले खणखणीत शेरो शायरी चा वापर करून भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी समाजाच्या संघर्षाविषयी माहिती दिली. मागच्या तब्बल दोनशे दिवसाच्या नंतर सामाजिक ठिकाणी हे त्यांचे पहिलेच भाषण होते.        धनंजय मुंडे यांनी उल्लेख केला की मागील काही दिवसात, “मला बदनाम करा, पण बीडला,माझ्या मातीला व माझ्या जातीला बदनाम केले.” संकटाच्या काळात समाज खंबीरपणे पाठीमागे राहिला याबद्दल समाजाचे आभार हे त्यांनी मानले. सुरुवातीच्या काळात ज्या समाजाने प्रचंड शिव्या श्राप व दगड घातले त्याच समाजात आज सन्मानाने बोलवले हे एक प्रकारे संघर्षाचा विजय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.      धनंजय मुंडे यांच्या आज ठाण्यातील भाषणात त्यांनी वंजारी समाजाच्या प्रगतीसाठी आवाज उठवला. त्यांनी बीड जिल्ह्याबाबत होत असलेल्या बदनामीविरुद्ध तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. समाजाला राज...

वंजारी समाज राज्यस्तरीय अधिवेशन Live

Image
 समाज राज्यस्तरीय अधिवेशन Live  वंजारी समाज राज्यस्तरीय अधिवेशन live

वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन

Image
आमदार धनंजयजी मुंडे लावणार मिळाला उपस्थिती.  मोठी बातमी : धनंजयजी मुंडे वंजारी समाजाच्या ठाणे येथील राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरावरील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा  व समाज रत्न पुरस्कारांचे वितरण ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन टॉप प्लाझा ठाणे येथे करण्यात आलेले आहे.       या समारंभाला समाजातील विविध संत महात्मे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगविख्यात मित्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने हे असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष डॉक्टर अमोल गीते हे असणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सांप्रदायिक, शैक्षणिक,क्रीडा, प्रशासकीय,वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा येतोच सन्मान येथे केला जाणार आहे. त्यांना समाज रत्न या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.      राज्यस्तरावरील एमपीएससी तसेच केंद्रस्तरावरील यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्य...

रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या हाताने स्वत:ला इंजेक्शन देऊन संपवलं, तरुण डॉक्टराच्या कृत्याने बीड हादरलं

Image
                  बीड हादरले... बीड:बीड जिल्ह्यातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील एक खासगी रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. स्वत:ला इंजेक्शन देऊन डॉक्टराने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे बीडच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील एका खाजगी रुग्णालयात ही घटना घडली. डॉ.संजय ढवळे असं आत्महत्या केलेल्या डॉक्टराचं नाव आहे. ढवळे हे निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉक्टर संजय ढवळे यांनी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टर ढवळे हे भूल तज्ञ म्हणून कार्यरत होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते रुग्णालयात कार्यरत होते. ढवळे यांनी भूल देण्याच्या औषधाचे इंजेक्शन त्यांनी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

बावणकशी सुवर्ण पंकजा मुंडे..

Image
  बावणकशी सुवर्ण पंकजा मुंडे  जीवनतला एखादा काळा दिवस, कधीच स्मरणातुन जात नसतो। नेतृत्व हरण्याएवढ दुसरा कोणताच मोठा घात नसतो। ताईंच्या आयुष्यात चार जून ही, असाच काळा दिवस होता। साहेबांच्या पश्चात लोकांना सांभाळणं, त्यांच्या गुणांचा कस होता। लोकसभेचा निसटता पराभव पत्करुन, ताई कामाला लागल्या आहेत। वडीला प्रमाने पुन्हा एकदा, पक्ष निष्ठेला जागल्या आहेत। पंकजाताई खासदार झाल्या असत्या तर, परिणाम लोकांना कळाले असते  मोठ्या प्रतीक्षा नंतर बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्री पद मिळाले असते नुसत्या पश्चातापाने कधीच पहिले दिवस येत नसतात.  जाणून-बुजून केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त होत नसतात. म्हणूनच तर जणूनियतीने, ताईंचे नजर काढली आहे. विधान परिषदेवर वर्णी लागल्याने पुन्हा जमीनदारी वाढली आहे. विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने नीटनेटकी बसू शकते,ताई महाराष्ट्रातच राहाव्यात ही  श्रींचीच इच्छा असू शकते. पक्षाने टाकलेल्या विश्वासाला ताई कृतीतून पात्र ठरत आहेत केंद्रातील जिम्मेदारी सांभाळून त्या बीड जिल्ह्यात फिरत आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी त्यांचा दौरा खास असतो.असंख्य मतदारांचा जिल्ह्...

धनंजय मुंडे मंत्रीमंडळात लवकरच येणार ?

Image
  धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट        धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. एका प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देऊ, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात कमबॅक होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली जमानिया यांनी मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची केस लोकायुक्तमध्ये चालू असून ती फुलप्रुफ असल्याचे त्यांनी सांगितले. "या जन्मी धनंजय मुंडे त्यातून बाहेर येणं शक्य नाही," असे अंजली दमानिया म्हणाल्या. हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरवर अपीलमध्ये जाण्याचे आव्हान त्यांनी याचिकाकर्त्यांना दिले आहे. भ्रष्टाचाराचा अँगल केसमध्ये ऐकला गेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळू शकत नाही आणि ते मंत्रिमंडळात परत येऊ शकत नाहीत, असे अंजली जमानिया यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा काही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जाऊ शकता...