वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन
- Get link
- X
- Other Apps
आमदार धनंजयजी मुंडे लावणार मिळाला उपस्थिती.
मोठी बातमी : धनंजयजी मुंडे वंजारी समाजाच्या ठाणे येथील राज्यस्तरीय अधिवेशन व विचार मंथन मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरावरील विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा व समाज रत्न पुरस्कारांचे वितरण ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन टॉप प्लाझा ठाणे येथे करण्यात आलेले आहे.
या समारंभाला समाजातील विविध संत महात्मे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगविख्यात मित्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने हे असणार आहेत. तर स्वागताध्यक्ष डॉक्टर अमोल गीते हे असणार आहेत. कार्यक्रमांमध्ये सांप्रदायिक, शैक्षणिक,क्रीडा, प्रशासकीय,वैद्यकीय, पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा येतोच सन्मान येथे केला जाणार आहे. त्यांना समाज रत्न या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
राज्यस्तरावरील एमपीएससी तसेच केंद्रस्तरावरील यूपीएससी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्यांचा तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या गुणवंताचा सत्कार देखील याप्रसंगी केला जाणार आहे. राज्यभरातील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री धनराज गुट्टे यांनी केले आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment