धनंजय मुंडे मंत्रीमंडळात लवकरच येणार ?
- Get link
- X
- Other Apps
धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट
धनंजय मुंडेंना कृषी घोटाळ्याच्या आरोपातून क्लीन चीट मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. एका प्रकरणात दिलासा मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देऊ, असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळात कमबॅक होणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली जमानिया यांनी मात्र यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांची केस लोकायुक्तमध्ये चालू असून ती फुलप्रुफ असल्याचे त्यांनी सांगितले. "या जन्मी धनंजय मुंडे त्यातून बाहेर येणं शक्य नाही," असे अंजली दमानिया म्हणाल्या. हायकोर्टाने दिलेल्या ऑर्डरवर अपीलमध्ये जाण्याचे आव्हान त्यांनी याचिकाकर्त्यांना दिले आहे. भ्रष्टाचाराचा अँगल केसमध्ये ऐकला गेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे धनंजय मुंडेंना क्लीन चीट मिळू शकत नाही आणि ते मंत्रिमंडळात परत येऊ शकत नाहीत, असे अंजली जमानिया यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काही मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात किंवा काही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment