बावणकशी सुवर्ण पंकजा मुंडे..
- Get link
- X
- Other Apps
बावणकशी सुवर्ण
![]() |
| पंकजा मुंडे |
जीवनतला एखादा काळा दिवस,
कधीच स्मरणातुन जात नसतो।
नेतृत्व हरण्याएवढ दुसरा
कोणताच मोठा घात नसतो।
ताईंच्या आयुष्यात चार जून ही,
असाच काळा दिवस होता।
साहेबांच्या पश्चात लोकांना सांभाळणं,
त्यांच्या गुणांचा कस होता।
लोकसभेचा निसटता पराभव पत्करुन,
ताई कामाला लागल्या आहेत।
वडीला प्रमाने पुन्हा एकदा,
पक्ष निष्ठेला जागल्या आहेत।
पंकजाताई खासदार झाल्या असत्या तर,
परिणाम लोकांना कळाले असते
मोठ्या प्रतीक्षा नंतर बीड जिल्ह्याला केंद्रात मंत्री पद मिळाले असते
नुसत्या पश्चातापाने कधीच पहिले दिवस येत नसतात.
जाणून-बुजून केलेल्या चुका पुन्हा दुरुस्त होत नसतात.
म्हणूनच तर जणूनियतीने, ताईंचे नजर काढली आहे. विधान परिषदेवर वर्णी लागल्याने पुन्हा जमीनदारी वाढली आहे.
विस्कटलेली घडी पुन्हा नव्याने नीटनेटकी बसू शकते,ताई महाराष्ट्रातच राहाव्यात ही श्रींचीच इच्छा असू शकते.
पक्षाने टाकलेल्या विश्वासाला ताई कृतीतून पात्र ठरत आहेत केंद्रातील जिम्मेदारी सांभाळून त्या बीड जिल्ह्यात फिरत आहेत.
निवडणूक कोणतीही असली तरी त्यांचा दौरा खास असतो.असंख्य मतदारांचा जिल्ह्यात त्यांच्या आदेशावर विश्वास असतो
समोर आलेले सगळेच अडथळे पायापासून खाण्याचे आहेत चार घड्याळ आणि दोन कमळ जिल्ह्यातून निवडून आणायचे आहेत
कदाचित नियतीला अजून एखादा गोड स्वप्न पडलेलं असेल भविष्यात महाराष्ट्राचं नेतृत्व सुद्धा त्यांच्या रूपात दडलेला असेल.
जे होतंय ते चांगल्यासाठीच हा लोकसभेतून बोध घेऊया भविष्यातील उत्तुंग कारकीर्दीसाठी मतासोबतच त्यांना शुभेच्छा देऊया..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब....
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment