अब तुमसे मिटने का खौफ नही. शेरोशायरी करत धनंजय मुंडे विरोधकांवर बरसले..
- Get link
- X
- Other Apps
समाजाच्या मेळाव्यात धनंजय मुंडे यांचे प्रभावी व भावनिक भाषण
ठाणे: राज्यस्तरीय वंजारी ठाणे येथील झालेल्या समाजाच्या मेळाव्यात आज धनंजय मुंडे यांनी अतिशय प्रभावीपणे समाजापुढे आपले खणखणीत शेरो शायरी चा वापर करून भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीसच त्यांनी समाजाच्या संघर्षाविषयी माहिती दिली. मागच्या तब्बल दोनशे दिवसाच्या नंतर सामाजिक ठिकाणी हे त्यांचे पहिलेच भाषण होते.
धनंजय मुंडे यांनी उल्लेख केला की मागील काही दिवसात, “मला बदनाम करा, पण बीडला,माझ्या मातीला व माझ्या जातीला बदनाम केले.” संकटाच्या काळात समाज खंबीरपणे पाठीमागे राहिला याबद्दल समाजाचे आभार हे त्यांनी मानले. सुरुवातीच्या काळात ज्या समाजाने प्रचंड शिव्या श्राप व दगड घातले त्याच समाजात आज सन्मानाने बोलवले हे एक प्रकारे संघर्षाचा विजय असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
धनंजय मुंडे यांच्या आज ठाण्यातील भाषणात त्यांनी वंजारी समाजाच्या प्रगतीसाठी आवाज उठवला. त्यांनी बीड जिल्ह्याबाबत होत असलेल्या बदनामीविरुद्ध तीव्र शब्दांत आपली भूमिका मांडली. समाजाला राजकीय प्रतिनिधित्व, आर्थिक सक्षमता आणि आरक्षणाची गरज असल्याचे अधोरेखित करत त्यांनी विविध शासकीय योजनांची मागणी केली. भाषण भावनिक आणि आत्मियतेने भरलेले होते. संकटाच्या काळात सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहनही त्यांनी यावेळी समाजास केले. एक दिवस नक्कीच आपला येईल असा विश्वास त्यांनी यावेळी सर्वांना दिला. आज तरी आपला कोणी द्वेष करत असेल तरी आपण सर्वांशी चांगलेच वागायचे एक दिवस नक्कीच समोरचा आपल्याला सन्मानाने वागवेल असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. आपल्याला ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा व राष्ट्रसंत वामन भाऊ यांनी दिलेल्या शिकवणीवर चालावयाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
आज समाजातील जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाले आहेत त्यांनी 80 टक्के जो समाज ऊसतोड मजुरी करतो त्यांच्या साठी सर्वांनी त्यांच्या अडीअडचणीसाठी उभे राहवे खरी गरज त्यांची आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
येत्या काळात यूपीएससी व एमपीएससी तयारी करणाऱ्या मुलांसाठी संभाजीनगर व पुणे येथे हक्काची जागा उपलब्ध करून येणाऱ्या एका वर्षाच्या आत विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासाची सोय उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही यावेळी त्यांनी समाज बांधवांना दिले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन गरजू गुणवंतांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे आर्थिक दृष्ट्या मागे उभे राहावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. आजच्या या कार्यक्रम प्रसंगी अनेक शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तींचा सन्मान यावेळी समाजातल्या पुरस्काराने करण्यात आला.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment