" टीईटी शिवाय नोकरी? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा धक्का शिक्षकांना!"
नवी दिल्ली : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पास न केलेल्या शिक्षकांना मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, निवृत्तीला फक्त पाच वर्षे उरलेले शिक्षकच टीईटीशिवाय सेवेत राहू शकतील. पाच वर्षांपेक्षा जास्त सेवाकाळ बाकी असलेल्यांना मात्र टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरणार आहे.
सोमवारी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला. न्यायालयाने सांगितले की, ज्यांनी अद्याप टीईटी उत्तीर्ण केलेले नाही आणि त्यांच्या निवृत्तीला पाच वर्षांहून अधिक काळ बाकी आहे, त्यांना परीक्षा पास करणे अपरिहार्य आहे. अन्यथा, त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन टर्मिनल बेनिफिट्स स्वीकारावे लागतील.
२०१० मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक अर्हता निश्चित केली होती. त्यानंतर शिक्षक भरतीमध्ये टीईटी बंधनकारक करण्यात आली होती. तथापि, काही राज्यांमध्ये याविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र, तामिळनाडूसह विविध राज्यांतून आलेल्या या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली आणि अखेर आता टीईटीची अट कठोरपणे लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
या निर्णयामुळे सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांना परीक्षेची तयारी करून उत्तीर्ण होणे भाग पडणार आहे. तर, निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
चुकीचा निर्णय आहे
ReplyDeleteशिक्षण क्षेत्राला उध्वस्त करण्याचा प्रयत्न म्हणजे हा निर्णय होय
ReplyDeleteफक्त शिक्षकाची परीक्षा का इतर विभागाची ही अशीच परीक्षा घ्या.
ReplyDelete