मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त रुबाबदार असणारा नेता मुंडे साहेब होते: देवेंद्र फडणवीस
 |
| स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना |
लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पुतळ्यांचे अनावरण
लातूर ११/०८/२०५
लातूर जिल्हा परिषदेच्या अंगणात स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या शेजारी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी श्रीमती पंकजाताई मुंडे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री,लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रराजे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे, लातूर ग्रामीणचे आमदार रमेश आप्पा कराड, उदगीर चे आमदार संजय जी बनसोडे,आमदार अभिमन्यू पवार, निलंगा आमदार संभाजी पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी आ.धनंजय मुंडे यांनी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणींचा उजाळा दिला, तसेच पंकजा मुंडे यांनी भावनिक होत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विषयीच्या आठवणी सांगितल्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2014 मध्ये आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहणार होतो परंतु नियतीने आम्हाला साथ दिली नाही परंतु त्यांचा शिष्य म्हणून मला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. श्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना 1995 साली राज्याचा विधानसभेचा विरोधी पक्ष नेता कसा असावा याचे आजपर्यंतचे सर्वोत्तम उदाहरण मुंडे साहेबांनी राज्याला दिले. गृहमंत्री असताना मुंबईतील अंडरवर्ल्डचे जाळे त्यांनी उखडून टाकले. सभागृहात त्यांचा वेगळाच दरारा होता, ते ज्या वेळेस सभागृहात उठायचे त्यावेळेस सर्व सभागृह त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊन बसायचे ते प्रत्येक प्रश्न दमदारपणे मांडत असत. सत्ता गेल्यानंतरही पंधरा वर्षे सत्ता नसली तरी सुद्धा ते जर रस्त्याने चालायला लागले तर राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पेक्षा जास्त गर्दी खेचणारे नेते म्हणून वागले. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना अतूट प्रेम दिले. गोरगरीब सर्वसामान्यांचे प्रश्न पोटतिडकिने मांडणारा वंचित पिढी त्यांना न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. गरिबातील गरीब लोकांना हे आमदार खासदार होण्याचे स्वप्न त्यांनी दाखवले व गोरगरीब जनतेला त्यांनी आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य अशी कितीतरी पदे मिळवून दिली अशा आठवणींना श्री देवेंद्र फडणीस यांनी उजाळा दिला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले,"1990 च्या दशकात सत्ताधाऱ्यांना मुंडे साहेब संताजी धनाजी याप्रमाणे दिसत होते."
Comments
Post a Comment