बदलीचे फॉर्म भरण्यासाठी शिक्षक हैराण..
 |
| Getty image |
PAT परीक्षा व बदली प्रक्रिया सोबतच आल्याने शिक्षकांमध्ये फॉर्म भरण्यासाठी गोंधळ
जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेतील सर्वात मोठा टप्पा असलेला संवर्ग चार चा टप्पा सुरू झालेला असून सुरुवातीचा एक दिवस साईट चालल्यानंतर, साईट अतिशय स्लो झाल्यामुळे बदली पात्र शिक्षकांना वेबसाईटवर शाळांचे विकल्प निवडताना साईट स्लो चालत असल्याने खूप वेळ लागत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये पेट परीक्षा चालू असल्याने बदली प्रक्रियेचे फॉर्म व पेट प्रक्रिया एकाच वेळेस आल्याने शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ग्रामविकास मंत्री यांनी मुदतवाढ देणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी आणखी ही मुदत वाढ झाली असल्याचा संदेश प्राप्त झालेला नसल्याने शिक्षकांची ओढी त्या साइटवर पडल्याने बदलीची साईट खूप धीम्या गतीने चालत आहे.
दिलेल्या मुदतीत फॉर्म न भरल्यास अडचण निर्माण होऊ नये म्हणून शिक्षक दिवस-रात्र जागून फॉर्म भरण्यासाठी धडपडत आहेत. परंतु कंपनीतर्फे कोणतेही अधिकृत मुदतवाढीची घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे सूर व्यक्त केला जात आहे.
फॉर्म भरत असताना ओटीपी ची समस्या येत असून नोंदणी करत मोबाईल व ईमेलवर ओटीपी यायला वेळ लागत आहे त्यामुळे शिक्षकांना फॉर्म भरताना अडचण येत आहेत. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी सर्व शिक्षक संघटनांतर्फे करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment