रक्षा बंधन एक, अतूट बंधन
- Get link
- X
- Other Apps
"रक्षा बंधन" हा सण भावंडांच्या प्रेमाचं प्रतीक आहे.
भारतीय संस्कृतीत रक्षा बंधन हा सन बहीण-भावाच्या अतूट नात्याची जपणूक करणारा सण म्हणून अलोखला जातो.श्रावण महिन्यातील पर्णिमेला नारळी पौर्णिमा असे संबोधले जाते या पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला एक धागा बांधते,त्या जिव्हाळ्याचा धाग्याने भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचा विश्वास त्यानिमित्ताने बहिणीला देत असतो.
या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर राखी (राखीचा धागा) बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्याची, सुख-समृद्धीची प्रार्थना करतात. भाऊ बहिणीच्या संरक्षणाची वचनबद्धता देतो आणि तिला भेटवस्तू देतो.
भावंडांच्या नात्यातील आपुलकी, विश्वास आणि जबाबदारी अधोरेखित होते.
राखीच्या गाठीत प्रेमाच्या गोष्टी,
भावाच्या नजरेत काळजीच्या होत्या ज्योती.
बहिणीच्या हास्यातून उमलते आनंद,
रक्षणाचा वचन देतो भाऊ अखंड.
हा सण संपूर्ण भारतात, तसेच नेपाळ, मॉरिशस आणि इतरत्रही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
"राखीचा धागा फक्त नातं नाही,
तो प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचा बंध आहे.
रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment