जड वाहनांसाठी वाहतूक दि 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून सुरळीत सुरू होणार_ उपअभियंता शशिकांत उरगुंडे
परळी/ प्रतिनिधी
सन-१९९२ मध्ये बांधकाम केलेल्या परळी शहरातील रेल्वे पुलाचे तांत्रिकदृष्ट्या दुरुस्ती व मजबूतीकरणाचे काम करणे आवश्यक होते. राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूर यांनी तांत्रिकदृष्ट्या पुलाचे आयुष्य आणखी ३० वर्षानी वाढविण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी नियोजितपेक्षा आठवड्याचा जास्तीचा कालावधी घेतलेला आहे. मात्र या दुरुस्ती कामामुळे रेल्वे पुलाचे आयुष्य वाढून वाहतूक सुरक्षा उपायाद्वारे परळी व परिसरातील नागरिकांना सुरक्षित केले आहे. सदर बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग, लातूरचे कार्यकारी अभियंता प्रविण सुमंत, उपअभियंता शशिकांत उरगुंडे व शाखा अभियंता निलेश मुंडे, अक्षय पांंढरे व अजिंक्य गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली मे.ए.जी.कन्स्ट्रक्शन, छ.संभाजीनगर यांनी पूर्ण केले आहे.
Comments
Post a Comment