कौडगाव हुडा (परळी) गावाजवळ कार पुरात वाहून गेली; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू
- Get link
- X
- Other Apps
पुराच्या पाण्यात नदीमध्ये वाहून गेली चार चाकी गाडी
कौडगाव हुडा ता परळी वै येथील नदीमधे एक चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली.गाडीतील चार व्यक्तीपैकी दोन व्यक्ती झाडावर बसले आहेत.एसडीओ साहेब,डीवायएसपी साहेब,तहसीलदार साहेब व एपीआय साहेब घटनास्थळी हजर आहेत. पाण्याचा प्रवाह जोरात आहे.पाऊस चालू आहे.आपदग्रस्त व्यक्तीना प्रशासनाच्या व गावक-याच्या वतीने बाहेर काढणेचे प्रयत्न चालू आहेत.
अमर पौळ नावाचा तरुण पाण्याच्या बाहेर सुखरुप काढले असून दुस-या तरुणाला बाहेर काढणेसाठी प्रयत्न चालू आहेत.
इतर तरुणांना बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत प्रशासन अलर्ट आहे प्रयत्न करीत आहेत परंतु बाहेर काढणे शक्य नाही त्यामुळे आत्ताच मा.धनंजय मुंडे साहेब विभागीय आयुक्त साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना NDRF ची टीम किंवा हेलिकॉप्टरची व्यवस्था करणे बाबत बोलणे झाले आहे..
सदर ठिकाणी राजाभाऊ पौळ व दिग्रसचे सरपंच सुभाष नाटकर व या भागातील प्रमुख कार्यकर्ते,घटनास्थळी उपस्थित आहेत व माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांचे कार्यालय याबाबत सतर्क असून प्रशासनाशी संपर्कात आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment