मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...
केज: काल रात्रीपासून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मांजरा धरण भरून वाहण्याच्या स्थितीत आलेले असल्याने आज शनिवार रोजी मांजरा धरणाचे चार दरवाजे उघडले असून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे. आज दुपारी दोन वाजता धरणाचे चार दरवाजे उघडले असल्याने नदीपात्राच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
( धरणाचा दरवाजे उघडण्याचा व्हिडिओ येथे पाहण्यासाठी )
नदी काठवरील गावातील लोकांनी नदीच्या परिसरातील जनावरे, शेतातील साधन सामग्री सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हानी होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment