"सिंदफणा व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन "
- Get link
- X
- Other Apps
"माजलगाव प्रकल्पातून विसर्ग इशारा.."
सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन
माजलगाव,आज दि. 29-08-2025 रोजी रात्री 10:00 वा. माजलगाव धरणाच्या सांडव्याद्वारे सिंधफणा नदी पात्रात *5919* क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. तरी कुणीही सिंधफणा व गोदावरी नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये या करिता नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, ही विनंती.
दरम्यान नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदीच्या पात्रातील शेजारील जनावरे व नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे थोडे दिवस मध्ये नदीपात्रात कोणीही जाऊ नये असे सूचना हे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारची वित्त व मनुष्यहानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून आज दि. 29 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता माजलगांव धरण 85.26 टक्के भरलेले असून धरणात सद्यस्थितीत पाण्याची आवक सुरूच आहे. तसेच माजलगाव प्रकल्पाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा नियोजित टक्केवारी पेक्षा अधिक झाल्यास अतिरक्त पाण्याचा विसर्ग सिंदफणा नदीपात्रात कोणत्याही क्षणी सोडण्यात येवू शकतो त्यामुळे सिंदफना व गोदावरी नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सचिव अनुराधा ढालकरी यांनी केले आहे.
नदीपात्रातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढून पुरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करिता नदी काठच्या परिसरातील गावच्या लोकांनी सतर्क राहावे तसेच नदी पात्रात कोणीही उतरु नये, वाहने, पशुधन सोडू नये किंवा कोणतीही जिवित वा वित्तहानी होणार नाही याबाबत सर्व पुरप्रवण क्षेत्राच्या गावातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
सिंदफना व गोदावरी काठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment