शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली घोषणा
मराठी शाळे सोबतच आता सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत सोबतच राज्य गीत बंधनकारक करण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.
सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता राष्ट्रगीत झाल्याच्या नंतर राज्य गीत घेणे बंधनकारक करण्यात आले आहे असा आदेश शासनाने काढला आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्य गीत आता सर्वच शाळांमध्ये बंधनकारक असणार आहे. ज्या शाळा या आदेशाचे पालन करणार नाहीत त्या शाळांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा श्री दादा भुसे यांनी दिला.
राज्य गीते मानवंदनेने गायले पाहिजे. मराठी माध्यमांसोबतच सर्व माध्यमांच्या शाळांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असा आदेश काढण्यात आला आहे.
Comments
Post a Comment