शरद पवार गटाच्या पॅनलचा धुव्वा..
- Get link
- X
- Other Apps
वैद्यनाथ बँकेवर मुंडे बहीण भावाचे एकहाती वर्चस्व.
शरद पवार गटाच्या पॅनल चा उमेदवारांच्या डिपॉझिट जप्त.
![]() |
| वैद्यनाथ नवनियुक्त संचालक गोपीनाथ गड येथे नतमस्तक झाले तो क्षण |
बीड:१२/०८/२०२५, वैद्यनाथ बँक च्या निवडणूक मध्ये झालेल्या मतदानाची आज मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये माहिती पुरस्कृत पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. मंत्री पंकजा मुंडे व त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दोघांनी मिळून एकत्र बनवलेला होता. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे राजेभाऊ फड यांनी स्वतःसह इतर दोन उमेदवार उभे केल्याने बँकेसाठी निवडणूक लागली होती त्यामध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळवला. पंकजा मुंडे यांच्या पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. शरद पवार गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये मुंडे बहीण भावांचे चालते असा संदेश या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी दिल्याचे समजते.
सर्व विजयी उमेदवारांचे यशस्वी निवासस्थानी खासदार पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले. वैद्यनाथ बँकेवर एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा मिळविले आहे. मराठवाड्यामध्ये 108 शाखा असलेली बँक मोठी बँक म्हणून ओळखली जाते. परळी पासून फार मुंबईपर्यंत एकूण 36 मतदार केंद्रावर मतदान प्रक्रिया शनिवारी पार पडली होती. जवळपास 43 हजार मतदार या निवडणुकीसाठी पात्र होते त्यापैकी 37 टक्के मतदान झाले होते.
वैद्यनाथ अर्बन बँकेच्या निवडणुकीचा निकालामध्ये सर्वच्या सर्व १७ संचालक यात मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले. निकालानंतर माजी खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे आणि बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड यांच्यासह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेतले. याठिकाणी डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी सर्वांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यानंतर हया सर्व उमेदवारांनी यशःश्री निवासस्थानी येऊन माझी आई प्रज्ञाताई मुंडे यांची भेट घेतली व आभार मानले. आईंनी प्रत्येक विजयी उमेदवाराला स्वतःच्या हाताने पेढा भरवून सर्वांचे अभिनंदन केले. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
- Get link
- X
- Other Apps

Comments
Post a Comment